आज या राशीच्या लोकांनी राग आवारा नाहीतर…

मेष:-स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ती योग्य वेळी वापरात आणाल. हुकुमशाहीपणा दूर सारावा.

वृषभ

परदेशी जाण्यास इच्छुक असणार्‍यांना चांगली संधी आहे. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एक दोन धार्मिक स्थळाच्या यात्रेमुळे मन आनंदी बनेल. नोकरी-व्यवसायात कामाचा भार वाढेल. तरीही आर्थिक लाभाची शक्यता आहे.

मिथुन:-प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत.

कर्क-समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल.

सिंह:-गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. उगाचच विवंचना लागून राहील. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. काही गोष्टी स्थिर होण्यास वेळ द्यावा.

कन्या:-अत्यंत व्यवहारीपणे वागाल. मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल. नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. इतरांचा विश्वास संपादन करावा.

तूळ:-घरातील ज्येष्ठांचा आदर करावा. जवळचा प्रवास जपून करावा. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल. आळस बाजूला सारावा लागेल.

वृश्चिक:-शांत व खोलवर विचार करावा. काही गोष्टींचे मनन करावे लागेल. चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत. अति महत्त्वाकांक्षा बाळगाल. भावंडांची काळजी लागून राहील.

धनु – श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. असामंजस्यामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड जाईल. मन दुःखी राहील.

मकर:-चटकन निराश होणे टाळावे. परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे. स्त्रियांवरून वाद वाढू शकतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ:-काही गुणांना उशिरा वाव मिळेल. मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. वेळेचे बंधन पाळावे.

मीन- आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button