नवरा बायकोचा भांडण. अन..हवालदारास बसतात फटके

साताराः

नवरा बायकोचे भांडण म्हटले तर प्रत्येक जण लांब राहतो.मात्र सद रक्षाणय म्हटल्यावर पोलीसांना आपलं ब्रीद सतत लक्षात राहते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील हुमगाव (ता. जावळी ) येथे पती पत्नीचे भांडण सोडवितांना चक्क हवालदारास फटके खाण्याची वेळी आली आहे. 

सातारा पोलीसांच्या माहितीवरुन अश्विनी संतोष पवार हिने पती संतोष पवार हा मारहाण करत आहे. मला तुमची मदत लागते असा फोन पोलीस मुख्यालयात केला होता. यावरुन पोलीस मुख्यालयातून कुडाळ पोलीस ठाण्यात मध्ये महिलेच्या तक्रारीवरुन कारवाई करण्यासाठी पोलीस हवालदार पद्मसेन घोरपडे यांनी याबाबत माहिती घेतली. घोरपडे जेंव्हा त्याच्या घरी पोहचले तेंव्हा हे दोघे पती पत्नी भांडण करत होते. 

हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या घोरपडे यांना अश्विनीच्या नव-याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये ते जखमी झाले. 

नव-या बायकोच्या भांडण्यात मार खाण्याची वेळी पोलीसांवर आल्याने ही गोष्ट समाजासाठी चांगली नाही. यामुळे सातारा पोलींनी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

कुडाळ (जि. सातारा) : हुमगाव (ता. जावळी) येथे पती आणि पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पद्मसेन संभाजीराव घोरपडे (वय 28) यांना महिलेच्या पतीने मारहाण करत जखमी केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button