महाराष्ट्रनाशिक

बँकेत पैसे सुरक्षित नाही ? नाशिकच्या व्यावसायिकाला 39 लाखांचा गंडा… बातमी वाचून तुमची झोप उडेल…

बँकेत पैसे सुरक्षित नाही ? नाशिकच्या व्यावसायिकाला 39 लाखांचा गंडा...

नाशिक l नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नाशिक मधील एका प्रख्यात व्यावसायिकाला तब्बल 39 लाखांचा गंडा घातलाय. यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

नाशिकमधल्या प्रख्यात व्यावसायिकाला तब्बल 39 लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बँकेला परस्पर बनावट ई-मेल पाठवून त्याने हे कुंभाड रचले.

त्यातही दुसरे विशेष म्हणजे सदोदित दक्ष असण्याचा दिखावा करणाऱ्या बँकेने या मेलवर विश्वासही ठेवला. अशी ही चित्रपटालाही शोभेल मोठी रंजक स्टोरी. तुमच्या-आमच्या डोळ्यांत दक्षतेचे लख्ख अंजन घालते.

सविस्तर वृत्त असे की,व्यवसाय जगतातील प्रख्यात नाव असणाऱ्या वासन समूहाच्या एका शोरूमच्या संचालकांचे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत खाते आहे. भामट्याने चोरीची हीच सुवर्ण संधी मानली. त्याने प्रदीप वासन यांच्या नावाने एक बनावट ई-मेल अॅड्रेस तयार केला. या अॅड्रेसवरून एक खरमरीत पत्र बँक ऑफ बडोदाच्या नाशिक शाखेला लिहिले. त्यातून तत्काळ पाच वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 39 लाख 32 हजार 932 रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करावेत, असा लकडा लावला.

बँकेच्या व्यवस्थापकांनी एवढी मोठी रक्कम पाहून त्याची पडताळणी सुरू केली. तेव्हा भामट्याने आपण वासन बोलत असल्याचे भासवले. त्यासाठी तात्काळ मोबाइलवरून बँकेशी संपर्क साधण्याचा चतुरपणा केला.

शिवाय फोनवरही तत्काळ व्यवहार पूर्ण करा, असा तगादा लावला. बँकेने डोळे झाकून संबंधिताच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि काही वेळातच पैसे वर्ग करायला सुरुवात केली. त्यानंतर नेट बँकिंगद्वारे जसे जसे पैसे कमी होत गेले, तसे तसे मेसेज व्यावसायिकांच्या मोबाइलवर धडकू लागले. त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधला. तेव्हा हा सारा प्रकार उघड झाला. मात्र, तोपर्यंत बराच वेळ झाला होता.

कसे बँकेचे धाबे दणाणले

जेव्हा खरे खातेदार वासन यांचा बँकेत फोन धडकला, तेव्हा व्यवस्थापकांचे धाबे दणाणले. त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले. या साऱ्या घोळाची कल्पना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांना दिली. त्यांनी पोलीस निरीक्षक सुरेश कोरबू व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या.

त्यांनी संबंधित पाच खाती असलेल्या तीन शाखांशी संपर्क साधला. त्या संबंधित खात्यावर जमा होणारी रक्कम थांबवण्याच्या सूचना केल्या. मात्र, फक्त 13 लाख 37 हजार रुपये जमा होण्यापासून वाचवण्यात यश आले. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरून असे सिद्ध झाले आहे की सध्या बँकेत तरी पैसे  सुरक्षित नसल्याचे बोलले जाते. मात्र नाशिक पोलिस यावरती काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button