हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते

मुंबईः
जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले, “आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. ़
पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे.”भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्राचारार्थ बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती.
राणे सातत्याने सरकारवर टीका करत असल्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले यावर त्यांनी “गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं” अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती. महाविकास आघाडी सरकार पडणार असं सांगत भाजपा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे.