नाशिक मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

वेगवान न्यूज

नाशिक l आज नाशिक जिल्ह्याला विशाखापट्टणम येथून आलेल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ च्या माध्यमातून  25 के.एल. चे दोन टँकर प्राप्त झाले आहेत. देवळाली मालधक्का येथे सकाळी ११ च्या सुमारास ‘म झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला गरजेनुसार 85 मेट्रिक टन ऑक्सिजन ऐवजी 56 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होत होता.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये पुरेसा ऑक्सिजन साठा नव्हता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी अखेरीस काही प्रमाणात मदत म्हणावी लागेल.

त्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करणे बंद केले होते. मात्र आज ऑक्सिजन पुरवठा झाल्याने कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

जिल्ह्यात ऑक्सिजनची असलेली गरज आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारा साठा यातील तफावत उद्या येणाऱ्या अधिकच्या 50 मेट्रिक टन ऑक्सिजन टँकरमुळे भरून निघणार आहे, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी  सांगितले. व्यवस्थीतरित्या पोहोचावी यासाठी काल जिल्हा प्रशासनाने नियोजन केले होते.

ऑक्सीजन चे वाटप अहमदनगर सिन्नर नाशिक ग्रामीण धुळे या ठिकाणी ऑक्सीजन सप्लाय केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button