header ads
Above Article Ad
कोरोना अपडेट

देशभरात २४ तासांत ४५९ जणांनी गमावले प्राण,करोनाचा पुन्हा कहर!

नवी दिल्ली-

मागील काही दिवसांपासून दररोज रुग्णसंख्या वाढत असून, गुरुवारी समोर आलेल्या आकडेवारीने रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचं दिसून आलं. देशावरील करोना संकट अधिक गंभीर होताना दिसत आहे.

देशात साडेचारशेपेक्षा जास्त नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. २४ तासांत देशभरात ७२ हजार ३३० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 

महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाचा उद्रेक झाला असून, प्रचंड वेगाने लोकांना संसर्ग होत आहे.पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच करोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.

मागील २४ तासांत देशात रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ७२ हजार ३३० नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४० हजार ३८२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. काळजीची बाब म्हणजे मृत्यूची संख्याही वाढली आहे. याच कालावधीत देशात ४५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button