header ads
Above Article Ad
राजकारण

सरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहीत; कोनी दिली ही माहिती

मुंबईः

अजित पवार ज्या पद्धतीने बोलत आहेत ते पाहता ही निवडणूक त्यांच्या हातातून गेली आहे, असे दिसते. ते ज्या लोकांना भेटत आहेत ते कमी महत्त्वाचे आहेत.

त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे जीभेवरचा ताबा सुटला आहे, अशी टीकाही त्‍यांनी केली. अजित पवार अलिकडच्या काळात जोरात आहेत. त्यांना काय झालंय माहीत नाही, ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हाज को’ ही म्हण त्यांना चपखल लागू पडते, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

राज्यात सत्ताबदल अटळ आहे, तो कसा होणार आणि कधी होणार हे अजित पवार यांना माहीत आहे, असे धक्कादायक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

‘अजित पवार इतके छातीठोक कसे काय बोलतात यावर मी आता अभ्यास करणार आहे. त्यावर एमफील करण्याचाही विचार आहे. शरद पवार यांच्यावरील माझी पीएचडी अजून पूर्ण व्हायची आहे तरीही हा अभ्यास मी करणार.

अजित पवार यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेताता, पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, म्हणजे सत्य बाहेर येईल, असेही त्‍यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button