फेसबुकवरील मित्राने केला घात! महिला ठरली 25 पुरुषांची शिकार

वेगवान न्यूज

नवी दिल्ली, दि. 16 पीडित महिला दिल्लीमध्ये घरगुती काम करते. चार वर्षापूर्वी ती दिल्लीत आली आणि दिल्लीतच राहायची. महिलेची सागर नावाच्या तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. जानेवारी महिन्यात दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले.

फेसबुकवर मैत्री झालेल्या एका तरुणाने लग्नाची मागणी घातली. त्यानंतर वडिलांशी भेट घालून देतो म्हणून जंगलात घेऊन गेला. त्यानंतर त्या महिलेसोबत जे घडलं ते अंगावर काटा उभा करणार होतं. हो, एका महिलेवर २५ जणांनी आटूनपालटून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. ३ मे रोजी ही घटना घडली. ९ मे रोजी महिलेनं पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला.

काही काळ गेल्यानंतर आरोपी सागरने महिलेला लग्नाची मागणी घातली. त्याचबरोबर आपल्या वडिलांनाही भेटवतो, असं त्या महिलेला आरोपी म्हणाला. त्यानंतर होडल येथे आल्यास वडिलांची भेट होऊन शकते असं म्हणत २३ वर्षीय सागरने महिलेला यायला सांगितलं.

त्यानंतर ३ मे रोजी महिला प्रवास करून होडल येथे पोहोचली. तिथे ती आरोपी सागरला भेटली. त्यानंतर आरोपी महिलेला घेऊन रामगढमधील जंगलात घेऊन गेला. तिथे सागरचा भाऊ आणि त्यांच्या मित्रांचा होता. ते सगळे जंगलात असलेल्या हातपंपाजवळ ग्रुप दारू पित बसले होते.

महिला तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी आलटूपालटून तिच्या अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आकाश नावाच्या भंगार विक्रेत्याकडे महिलेला घेऊन गेले. त्या ठिकाणी महिलेवर पाच जणांनी बलात्कार केला. वारंवार बलात्कार करण्यात आल्याने महिलेची प्रकृती बिघडली. त्यामुळे आरोपींनी बर्दापूर सीमेवर महिलेला फेकून दिलं आणि फरार झाले.

या सगळ्या भयंकर घटनेनंतर १२ मे रोजी महिला हसनपूर पोलीस ठाण्यात गेली. महिलेनं आरोपीविरुद्ध तक्रार दिली. प्रकृती बिघडल्याने तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचं महिलेनं पोलिसांना सांगितलं. या घटनेविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी राजेश यांनी सांगितलं,”पोलिसांनी आरोपी सागरला शुक्रवारी अटक केली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. संबंधित कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button