महाराष्ट्रट्रेंडिंग न्यूजमुंबई

मोठा निर्णय : अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर… प्रत्येकी शेतकऱ्याला मिळणार एवढे पैसे ?

मोठा निर्णय : अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर... प्रत्येकी शेतकऱ्याला मिळणार एवढे पैसे ?

मुंबई l सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीत गेल्याने शेतकरी राजाने हंबरडा फोडला होता. मात्र अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठा पॅकेज जाहीर केले आहे.

शेतीचा पिकाचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली. अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही विनंती राज्य सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे.

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली.

राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.

नेमकं शेतकऱ्यांना मदत किती मिळणार?

1) बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर

2) जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर

3) बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर

ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button