मोठी बातमीःआठ पोलिसांना ठार मारणारा गँगस्टर विकास दुबे पोलीसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

त्याआधी विकासच्या तीन साथीदारांचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. गेल्या काही दिवसांपासून विकास दुबेचा शोध सुरू होता. विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्रीगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथून त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आलं आहे.

विकास दुबेला अटक होताच उत्तर प्रदेश पोलिसांची एसटीएफ टीम उज्जैनला रवाना झाली आहे. विकास बुधवारी फरिदाबादमध्ये दिसला होता. तिथून तो उज्जैनला कसा पोहोचला, याबद्दलची चौकशी सुरू आहे. विकासच्या अटकेसाठी पोलीस सक्रिय असताना, त्याला राज्याबाहेर जाण्यास कोणी मदत केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला.

उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “विकास दुबे महाकाल मंदिरात जात असताना एका सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखलं आणि पोलिसांना माहिती दिली. चौकशी केली असता त्याने आपली ओळख उघड केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरु आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button