तंत्रज्ञानदेश - विदेश

मोठी बातमी ! अखेर टाटांनी एअर इंडियाला घेतलं विकत !

मोठी बातमी ! अखेर टाटांनी एअर इंडियाला घेतलं विकत !

नवी दिल्ली l टाटा समूहाची आणखी ताकद वाढणार आहे.टाटा समूहात गुंतवणूक करणाऱ्या ना मोठा फायदा होणार आहे. एअर इंडियाबद्दल मोठी बातमी दिल्लीतून येतेय. एअर इंडियाची जबाबदारी आता टाटा सन्सकडे असेल.

टाटांनी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. ती सर्वोच्च असल्यामुळे टाटाकडे एअर इंडियाची कमान देण्यात आलीय.

68 वर्षानंतर पुन्हा एकदा टाटाकडे एअऱ इंडिया आलीय. गेल्या काही वर्षात महाराजाची अवस्था वाईट होती. आता ती टाटांकडे गेल्यामुळे तिची हालत सुधारेल, अशी आशा व्यक्त केली जातेय.

मोदी सरकारने जुलै 2017 मध्ये एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून ती विकत घेण्याचा अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियाला आज नवीन मालक मिळाला.

एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली कोणी लावली याबाबत डीआयपीएएम सचिव आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव पत्रकार परिषद घेत माहिती दिलीय.

टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. त्यामुळे एअर इंडियाची मालकी आता टाटांकडे गेलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button