देश - विदेश
ब्रेकिंग – राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पहिल्यांदाच उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला…

नवी दिल्ली l खासदार उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज पहिलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही भेट होणार आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच भेट आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.उदयनराजे आणि शरद पवारांची ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.