BSNL ने लाँच केले तीन भन्नाट प्लॅन्स

नवी दिल्ली-

 

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने तीन नवीन पोस्टपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनीने 199, 798 आणि 999 रुपयांचे तीन पोस्टपेड प्लॅन आणले आहेत. याशिवाय कंपनीने काही पोस्टपेड प्लॅन्स हटवलेही आहेत.हे तिन्ही प्लॅन्स देशभरात सर्व सर्कलमध्ये उपलब्ध असतील.

यामध्ये 99, 225, 325, 799 आणि 1125 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन्सचा समावेश आहे. नवीन प्लॅन्सद्वारे जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या तीन दिग्गज खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन :-
कंपनीचा हा प्लॅन म्हणजे एक पॉकेट फ्रेंडली पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला बीएसएनएल टू बीएसएनएलसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सेवा मिळेल. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 300 मिनिटे मिळतील. या प्लॅनमध्ये एकूण 25GB डेटा वापरण्यासाठी मिळतो. यासोबतच 75GB डेटा रोलओव्हरची सुविधाही आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्सना 10.24 रुपये प्रतिजीबी पैसे द्यावे लागतील. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळते.

798 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन :-
या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सेवा मिळेल. म्हणजे देशभरात कोणत्याही नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग फ्री असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये 50GB डेटा वापरण्यास मिळतो. तसेच, 150GB डेटा रोलओव्हरची सुविधाही आहे. सोबतच दररोज 100 एसएमएसही मिळतात. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये दोन फॅमिली कनेक्शनची ऑफरही आहे. फॅमिली कनेक्शनमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधा, 50GB डेटा आणि 100 एसएमएस दररोज मिळतात.

999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन :-
या प्लॅनमध्येही प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सेवा मिळते. याशिवाय 75GB डेटा मिळतो, हा डेटा 225GB पर्यंत रोलओव्हर करण्याची सुविधा आणि दररोज 100 एसएमएसची सेवा मिळेल. टेलिकॉम कंपनी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सेवेसह तीन फॅमिली कनेक्शनचीही ऑफर देत आहे. प्रत्येक फॅमिली कनेक्शनसाठी 75 जीबी डेटा आणि दररोज 100SMS मिळतात.

या व्यतिरिक्त कंपनीने 99, 225, 325, 799 आणि 1125 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन्सना हटवलं आहे. सध्या या प्लॅन्सचा वापर करणारे ग्राहक कंपनीकडून नवीन माहिती येईपर्यंत याच प्लॅन्सचा वापर करु शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button