मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे करावं तेवढं कौतूक कमीच! – शरद पवार

मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात अनेक संकट आले आहे. आज राष्ट्रवादीचे सर्वसर्वे शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतूक केले आहे. ‘आजि सोनियाचा दिनु. कष्टाकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतोय.महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येतायत, यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे करावं तेवढं कौतूक कमीच अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये पार पडले असल्याचे खासदार शरद पवार म्हणाले,तसेच बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास असून महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते.

अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकसंधपणे येथे राहत आहेत.अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे.

या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असेही पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button