header ads
Above Article Ad
नाशिक

दिलासादायक – दहिवड येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 6 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह !

वेगवान न्यूज / मनोज वैद्य

दहिवड(१ जून) –

दहिवड येथे मुंबई येथून आलेल्या तरुणाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या नंतर पहिल्या दिवशी त्याच्या कुटुंबातील एक ७० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने दहिवड येथे २ रुग्ण करोना पॉझिटिव्ह झाले होते, त्यानंतर परत त्या कुटुंबाच्या संपर्कात असलेल्या शेजारीच राहणाऱ्या ५ व त्या तरुणाची प्राथमिक तपासणी करणाऱ्या दहिवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक असे एकूण ६ संशयित व्यक्तींचे स्वॅब आज दि.१ जून रोजी सकाळी करोना चाचणीसाठी देण्यात आले होते, त्यांचा अवहाल रात्री १०.वा प्राप्त झाला असून सर्व ६ रुग्णांचे अवहाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी दिली आहे. दहिवड परिसरातील जनतेसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button