header ads
Above Article Ad
देश - विदेश

कोरोनाचा कहर! 40 सेकंदाला एकाचा मृत्यू…

वॉशिंग्टन l कोरोनाची दुस-या लाटेमुळे अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक असून सहा महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. प्रत्येक ४० सेकंदाला एका व्यक्तीला जीव गमवावा लागत आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यावेळी मात्र कोरोनाने रौद्र रूप धारण केले असून बाधितांबरोंबरच मृत्यूचेही प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या २४ तासात १५७ रुग्णांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४० सेंकदा एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत असून बाधितांची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांसाठी बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. मंगळवारी अमेरिकेत १ लाख ७० नवीन रुग्ण आढळून आले.

हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १२.६ मिलियन नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. मंगळवारी मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ सहा महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत २४ तासांत ३ हजार ३८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

भारतातील परिस्थिती कशी?

अमेरिकेसारखी भयावह परिस्थिती भारतात नसली, तरी दिवसेंदिवस चिंता वाढताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

दिल्लीत बाधितांची संख्या वाढू लागल्याने हायअलर्ट जारी केला आहे. तर इतर राज्यांमध्ये दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येनं मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध आणले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button