होम

उदयनराजेंनी ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, नंतर बीएमडब्ल्यू घेतली !

उदयनराजेंनी ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, नंतर बीएमडब्ल्यू घेतली !

सातारा l नवीन कार घेण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र काही जणांना कार कलेक्शन करणे यातून नेहमी आनंद मिळत असतो. आपणही पाहिलेच असेल. सध्या भारतात अनेक नामांकित कंपन्यांच्या लक्झरी कार दाखल आहे. तसेच maruti suzuki, Hyundai, Honda, Volkswagen, Skoda, Kia, MG hectare, Renault, Chevrolet, Toyota.
या कंपन्यांच्या कार आपण रस्त्यावर नेहमी बघतो.

मात्र बीएमडब्ल्यू (BMW) रोल्स रॉयल (royals royal) मर्सडीज (Mercedes) यासारख्या महागड्या कार जवळून गेल्यानंतर अनेकांचे लक्ष आकर्षित करतात. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या हटके स्टाईलमुळे राज्यभर त्यांचे असंख्य चाहते आहेत.

नवीन नवीन कार कलेक्शन मुळे तसेच त्यांच्या राजकीय संपर्कामुळे उदयनराजेंना अनेक तरुण फाॅलो करतात.

त्यांना बाईक रायडींग करणे अधिक पसंत असून त्यांच्याकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. आज त्यांच्या गाड्यांच्या राॅयल कलेक्शनमध्ये आणखी एका कारची भर पडली.

बीएमडब्लू कंपनीची नवीनकोरी कार खरेदी केली आहे. त्याचा फोटो सोशल मिडियावर भलताच व्हायरल झाला. यावरुन त्यांची तरुणाईमध्ये किती क्रेझ आहे याची प्रचिती दिली आहे.

उदयनराजेंची तरुणाईत भलतेच ‘फेमस’ आहेत. सोशल मिडियावर तर त्यांचे लाखो फाॅलोवर असून त्यांच्या स्टाईलची अनेक जण काॅपी करतात. साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक जेव्हा नवीन गाडी विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच.

अनेक वेळा स्वतः उदयनराजेंनी त्याची रायडिंग केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

उदयनराजेंना सध्या कोणते आहे कार ?

उदयनराजे यांच्या ताफ्यामध्ये सध्या ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार आहेत.

तर त्यांच्या पत्नी दमयंतीराजेंकडे पोलो ही कार आहे. त्यांच्या या राॅयल कलेक्शनमध्ये आणखी एक कार दाखल झाली आहे. बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये आहे.

त्यांच्या सर्व गाड्यांना 007 हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे.

आज पुण्यातून गाडी खरेदी करतानाचा त्यांचा शोरुममधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button