header ads
Above Article Ad
Homeट्रेंडिंग न्यूजदेश - विदेश

आता पळू नका; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

नवी दिल्ली :

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास य़ांनी ईएमआय दिलासा देण्याची सूचना बँकांना केली होती. यावर बँकांनी ग्राहकांना ईएमआय दिलासा देतानाच त्यावरील व्याजाचा हिशेब दिला होता. तीन महिन्यांचा गृहकर्जाचा हप्ता दिला नाही तर व्याजाच्या बदल्यात तब्बल 8 हप्त्यांएवढी रक्कम मोजावी लागणार होती.

 वाहन कर्जासाठी दीड हप्ता जादा भरावा लागणार होता. याविरोधात दाखल याचिकेमध्ये आज सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयला यावर विचार करण्याची सूचना केली आहे. तसेच केंद्र सरकार या प्रकरणी हात वर करू शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे पगार, उत्पन्न बुडाले आहे. यामुळे जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हाच केंद्र सरकार आणि आरबीआयने ईएमआय भरण्यासाठी सूट दिली होती. मात्र, ही सूट आतबट्ट्याची ठरू लागल्याने एका वकीलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारला वास्तवापासून दूर पळू शकत नसल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button