ट्रेंडिंग न्यूजमहाराष्ट्रराजकारणलेटेस्ट न्यूज

बेरोजगारांच्या हातात भाजपने घंटा दिल्या,अन् बसा वाजवत ! – संजय राऊत

बेरोजगारांच्या हातात भाजपने घंटा दिल्या,अन् बसा वाजवत ! - संजय राऊत

मुंबई l शिवसेनेचे संजय राऊत यांनी सामानाच्या अग्रलेखातून केंद्राला चांगलेच झोडपले आहे. अच्छे दिन तुम्हाला माहिती आहे का ?… त्याच अच्छे दिनाचे वाभाडे निघाले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दाखवलेल्या अच्छे दिन विदारक चित्र समोर आले आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाच्या जीडीपीचे गुलाबी चित्र दोन दिवसांपूर्वीच रेखाटले.

त्या गुलाबाचे काटे आता टोचू लागले आहेत आणि पाकळ्या झडू लागल्या आहेत असं म्हणत शिवसेनेने संजय राऊत यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडले आहे.

ग्रामीण भागात बेरोजगारीने कहर केला आहे. ऑगस्ट महिन्यात 16 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. हे आहे का? अच्छे दिन…

शहरात काय परिस्थिती

शहरांतही वेगळी स्थिती नाही. लोकांना, तरुणांच्या हाताला काम हवे आहे. भाजपने बेरोजगारांच्या हाती घंटा दिल्या आहेत. घंटा वाचवत बसा व मंदिरे उघडा अशी मागणी करत रहा असे बजावले आहे.

घंटा बडवून वगैरे बेरोजगारीचा राक्षस मारला जाणआर असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयाने एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या दारात आता घंटा लावून रोजगार निर्मितीचे दालन उघडायला हवे.

16 लाख हा आकडा अलीकडचा आहे. मोदी सरकारने जी बेजबाबदार नोटबंदी देशावर लादली, त्या नोटबंदीने कोसळलेल्या अर्थव्यवस्थेखालीच दोनएक कोटी रोजगार चिरडला गेला.

नोटबंदी हे अर्थव्यवस्थेवरचे भयंकर संकट होते व त्यातून दोन कोटींवर लोकांनी कायमच्या नोकऱ्या गमावल्या असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही, पण लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे आणि त्यातून जे आर्थिक अराजक निर्माण झाले आहे त्याचे काय? या संकटाचा सामना केंद्र सरकार कसा करणार आहे? नोकऱ्यांचे काय करणार? असा सवालही विचारण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button