header ads
Above Article Ad
तंत्रज्ञानदेश - विदेश

या देशामध्ये Google Pay मनी ट्रान्सफर सेवेसाठी लागणार शुल्क…

नवी दिल्ली l काही दिवसांपूर्वी समोर आले होते की पुढील वर्षापासून गुगल पे (Google Pay) वापरताना काही शुल्क द्यावे लागणार…

मात्र आता याबाबत भारतीयांना दिलासा मिळाला आहे. गुगलने (Google) बुधवारी असे स्पष्ट केले आहे की, भारतात Google Pay ग्राहकांना पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आहे. हा शुल्काबाबतचा नियम अमेरिका स्थित गुगल पे ग्राहकांसाठी आहे.

दरम्यान गुगलच्या एका प्रवक्त्याने माहिती दिली आहे की, ‘विशेषत: हे शुल्क अमेरिकेसाठी आहे आणि भारतामध्ये गुगल पे किंवा गुगल पे फॉर बिझनेस (Google Pay for Business) अ‍ॅपवर हे शुल्क लागू होत नाही.

पुढील वर्षापासून बंद होणार वेब ब्राउजरच्या माध्यमातून गुगल पे च्या सेवा

गेल्या आठवड्यात गुगलने अशी घोषणा केली होती की, पुढील वर्षी अँड्राइड (Android) आणि आयओएस (iOS) वर नवीन Google Pay App आणत आहे आणि त्यानंतर युजर्स वेब ब्राउजरच्या माध्यमातून सेवांचा वापर नाही करू शकणार. शिवाय अहवालानुसार गुगल पे इन्स्टंट मनी ट्रान्सफरवर देखील शुल्क आकारणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button