header ads
Above Article Ad
महाराष्ट्रमुंबई

अखेर लाॅकडाऊन ठरलं ! शनिवारी व रविवारी काय असणार बंद ?

मुंबई l आता शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट भुमीका राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत घेण्यात आली आहे. याशिवाय करोना नियंत्रणात आणण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबाबतच्या गाइडलाइन्स जारी केल्या जाणार आहेत. हे निर्बंध उद्या (५ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून लागू असतील. दरम्यान, लोकलसेवा यापुढेही सुरूच राहणार आहे. राज्यात करोनाची स्थिती चिंताजनक होत चालल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती.

या बैठकीत लॉकडाऊनबाबत गंभीरपणे विचार करण्यात आला व त्यानंतर एकमताने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यात ज्याप्रकारे निर्बंध लावण्यात आले आहेत. तोच फॉर्म्युला राज्यात वापरण्याबाबत विचार करण्यात आला.

राज्यात वीकेंडला कडक लॉकडाऊन असणार आहे. येत्या शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी होईल. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली.

शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना पार्सल आणि टेक अवे सुविधा देण्याची परवानगी असेल. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागेल, असं मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं. याबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button