header ads
Above Article Ad
देश - विदेशमुंबई

रतन टाटांच्या या कार्याला सलाम ! दोन हजार डॉक्टरांच्या पोटापाण्याची घेतली काळजी

नवी मुंबई l वाढत्या कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मात्र रतन टाटा यांनी परिस्थितीचा आढावा घेत आपल्या समूहाच्या मदतीने आधी पंधराशे कोटी, ऑक्सिजन ट्रेन , तसेच मुंबई महापालिकेच्या सुमारे 14 कोविड सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची सेवा करणाऱ्या दोन हजार डॉक्टरांच्या पोटापाण्याची काळजी टाटा समूहाने घेतली आहे.

या डॉक्टरांना टाटा समूहाच्या ताज हॉटेलमधून दरदिवशी दोन वेळचे जेवण देण्यास आजपासून शुभारंभ करण्यात आला आहे.आपल्य़ा जीवावर उदार होऊन नवी मुंबई शहरातील विविध कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सुमारे दोन हजार डॉक्टरांची आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था चांगल्या ठिकाणी व्हावी यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हे प्रयत्नशील होते.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे टाटा समूहाच्या ताज हॉटेलमध्ये नवी मुंबईतील दोन हजार डॉक्टरांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

डॉक्टरांसाठी जेवण घेऊन आलेल्या ताज हॉटेलच्या गाडीचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख सोमनाथ वासकर, मनोज इसवे, एकनाथ दुखंडे, जितेंद्र कांबळी, महेंद्र धुमाळ, श्रीकांत हिंदळकर, विभागप्रमुख विजय चांदोरकर, दर्शन भगणे, ललित बुंदेला उपविभागप्रमुख संदीप पवार, प्रकाश ओंबले, गजानन घाग आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button