महाराष्ट्र

दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ! मान्सून परतीच्या मार्गावर…

दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ! मान्सून परतीच्या मार्गावर...

मुंबई | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसानं सगळीकडे थैमान घातलं आहे.शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी राजा चिंतातुर झाला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी साचलेले पाणी अजूनही ओसरले नाही.

रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरीत (ratnagiri) अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहील.

दरम्यान येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

आपल्याकडे मान्सूनची सुरवात सर्वसाधारपणे जून ते सप्टेंबर या काळात होते. मात्र यावेळेस परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला आहे.

अशातच आता मोसमी वारे परतीला जाण्यासाठी पूरक वातावरण असून, याचे परिणाम राज्यातील काही भागांवर दिसून येणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढेल. हे कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा व आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता असून पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.

परिणामी राज्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवस जोरदार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता राहणार असल्याचे हवामान विभागातील सूत्रांनी सांगितले.

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, याचा परिणाम म्हणून सोमवार आणि मंगळवारी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तविली आहे.

दरम्यान, राजस्थानच्या वायव्य भागातून परतीच्या पावसाला सुरुवात होते. त्यानंतर हवामान खात्याच्या निरीक्षण केंद्रांवर सतत नोंदणी ठेवण्याचं काम सुरू असतं.

अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात मान्सूनला अनुकूल काही परिस्थ‌िती दिसत असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर मग परतीच्या पावसाचे संकेत दिले जात नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button