breadcrumb-details

पूनम पांडेने राज कुंद्राविरोधात केला फौजदारी गुन्हा दाखल

Gallery

पूनम पांडेने राज कुंद्राविरोधात केला फौजदारी गुन्हा दाखल

वेगवान न्यूज नेटवर्क
09 February 2020 06:01 PM

मुंबई

- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. अभिनेत्री पूनम पांडेने राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर पूनमने उच्च न्यायालयाची मदत घेण्याचं ठरवलं. तर कुंद्राने स्पष्टीकरण देताना डिसेंबर २०१९ मध्ये त्याने संबंधित कंपनी सोडल्याचं म्हटलं.

जगभरातून सध्या पूनमला अनेक निनावी फोन येत आहेत. या फोन कॉलमुळे पूनम पूर्णपणे वैतागली आहे. एवढंच नाही तर गेल्या वर्षी जून महिन्यात एक टॅगलाइन (कॉल मी, आय स्ट्रिप फॉर यू ) तिच्या अॅपवर लीक झाली होती. पूनमच्या मते, तिचं अॅप राज कुंद्राची कंपनी चालवत होती..