breadcrumb-details

टाटाच्या नव्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँंच

Gallery

टाटाच्या नव्या तीन कार २२ जानेवारीला होणार लाँंच

वेगवान न्यूज नेटवर्क
20 January 2020 06:40 PM

नवी दिल्ली:


टाटा मोटर्स २०२० च्या सुरुवातीलाच तीन मॉडेल लाँच करणार आहे. टाटा नेक्सॉन, टाटा टियागो आणि टाटा टिगोर फेसलिफ्ट लाँच केल्या जाणार आहेत. या गाड्यांची प्री-बुकिंगही सुरू झाली आहे. ग्राहक ११ हजार रुपये देऊन आपल्या पसंतीचं मॉडेल बुक करू शकतात. तिन्ही मॉडेल्स BS6 इंजिनासह येणार आहेत. त्यामुळे किंमती थोड्याफार रास्त असू शकतात. गाड्याचं डिझाइन आणि फिचर अपग्रेड असेल.

२०२० Tata Nexon फेसलिफ्टची डिझाइन २८ जानेवारीला येणाऱ्या टाटा नेक्सन EV कारसारशी असेल. ही कार सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही १.२ लीटर पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिनासह येईल. २०२० टाटा टीगोर आणि टाटा टिआगो गाड्या BS6 १.२ लीटर पेट्रोल इंजिनासह येतील. या दोन्ही गाड्यांमध्ये डिझेल इंजिन हटवण्यात येईल. या गाड्यांमध्ये ५ स्पीड मॅन्युअर आणि एएमटीचा पर्यायही मिळू शकेल. याव्यतिरिक्त कंपनी सीएनजीचा पर्यायही देऊ शकते.