breadcrumb-details

गोपीनाथ मुंडे सारखा लोक नेता महाराष्ट्र भाजपात एकही नाही - राजु शेट्टी

Gallery

गोपीनाथ मुंडे सारखा लोक नेता महाराष्ट्र भाजपात एकही नाही - राजु शेट्टी

वेगवान न्यूज / केशव मुंडे
15 May 2020 09:27 PM

बीड -

चंद्रकांत पाटील हे पक्षाने वरून पाठवलेले कारकुणी नेते आहेत आसे सांगत गोपीनाथ मुंडे यांच्या सारखा लोकनेता भाजपा मध्ये नाही त्यांनी दिलेल्या एका हाकेवर लाखोंचा जनसमुदाय स्वतः पैसे खर्चुण आणि घरची भाकरी बांधून येत आसे माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटले आहे पाहुयात ते आणखी काय बोलले आहेत आजच्या भाजपच्या नेत्यांबद्दल 

"गोपीनाथ मुंडे हे जनतेतून निर्माण झालेले लोकनेते होते. त्यांच्या हाकेला साद देत लाखो लोक जमा व्हायचे. चंद्रकांत पाटील हे वरून पाठवलेले नेते आहेत. त्यांच्या आवाहनाला किती लोक प्रतिसाद देतील?'' असा सवाल माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

भारतीय जनता पक्षात विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल त्यांनी "सरकारनामा'शी बोलताना आपली मते व्यक्त केली.

शेट्टी म्हणाले,"गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष खेडोपाडी पोचवला, त्या पक्षाला एक चेहरा मिळवून दिला. आज महाराष्ट्रात भाजपचा विस्तार झाला, तो मुंडे यांच्यामुळे झाला आहे. गोपीनाथ मुंडे हे "ग्रास रूट'वर काम करून तयार झालेले नेते होते. ते लोकनेते होते. चंद्रकांत पाटील हे वरून आलेले नेते आहेत. त्यांना पक्षाने नेता बनविले आहे. त्यांच्या पाठीशी जनमत नाही.''

"कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांना भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवता आला नाही, याचे कारण त्यांचे नेतृत्व हे कोल्हापुरात निर्माण झालेले नाही. त्यांनी कोल्हापुरात लोकांच्यात जाऊन कसलीही चळवळ उभा केलेली नाही. लोकांनी त्यांना नेता मानलेले नाही, तर त्यांच्या पक्षाने त्यांना नेता बनवलेले आहे. ज्या माणसाला पक्षाने नेता बनवले आहे. त्याला लोक कसे मानतील आणि लोक कसे ऐकतील? '' असा सवाल राजू शेट्टी विचारला.

"भारतीय जनता पक्षाला लाटेवर सत्ता मिळाली, या लाटेवर मिळालेल्या सत्तेमुळे त्यांच्यात वादावादी आणि गटबाजी वाढली. कॉंग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्या भाजपने त्याच पक्षातील अनेक लोक आपल्या पक्षात घेतले. कॉंग्रेसचे सगळे दोष आता भाजपमध्ये आले आहेत. भविष्यात भाजपमधील वाद वाढत जातील ते मिटणार नाहीत,'' असेही शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांनी सांगितल्यामुळे मी पुण्यातून निवडणूक लढलो नाही तर कोल्हापुरातून कोणत्याही मतदार संघातून निवडून आलो असतो, असे वक्‍तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यावर मिश्‍किल हास्य केले. भाजपसारखा पक्ष आज देशात सत्तेत आहे, मात्र कोल्हापुरात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील काय म्हणतात, त्याला मी गांभीर्याने घेत नाही. त्यांना असे बोलायची सवय आहे. बऱ्याचवेळा त्यांनी भूकंप होणार असल्याची घोषणा केली. मात्र आज त्यांच्या पक्षात भूकंप होत असल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला.