breadcrumb-details

कोरोना व्हायरसवर लसवर अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प

Gallery

कोरोना व्हायरसवर लसवर अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प

वेगवान न्यूज नेटवर्क
16 May 2020 09:50 AM

वॉशिंगटन  :

 

 भारत आणि अमेरिका एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं ट्रम्प यांनी शुक्रवारी  सांगितले ते म्हणाले की भारतीय-अमेरिकन एक महान वैज्ञानिक आणि संशोधक आहेत, असेही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प  म्हणाले.


 ते म्हणाले की, 'मी काही दिवसांपूर्वी भारत दौरा केला असून भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे.

 

अमेरिकेमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यातील अनेक लोक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते उत्तम वैज्ञानिक आणि संशोधक आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरसवर प्रभावी लस विकसित होण्याची शक्यता आहे. असेही त्यांनी सांगितेल .