breadcrumb-details

झोमॅटो 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात

Gallery

झोमॅटो 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात

वेगवान न्यूज नेटवर्क
16 May 2020 03:51 PM

नवी दिल्ली :

 

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

 

17 मेनंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. देशात 14 एप्रिलपासून काही ठिकाणी अटी-शर्तींसह लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. त्यामुळे देशांत अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. अशातच ऑनलाईन फूड डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित काळजी घेऊन फूड डिलीवरी करण्यासाठी झोमॅटोलाही परवानगी देण्यात आली आहे. अशातच झोमॅटो जवळपास 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.