breadcrumb-details

चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; लावा’ कंपनी भारतात करणार ८०० कोटींची गुंतवणूक

Gallery

चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; लावा’ कंपनी भारतात करणार ८०० कोटींची गुंतवणूक

वेगवान न्यूज नेटवर्क
16 May 2020 04:01 PM

वृत्तसंस्था

लावा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर मोबाईलचं उत्पादन करणारी ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“उत्पादनाच्या डिझायनिंग क्षेत्रात चीनमध्ये कमीतकमी आमचे ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. आम्ही आता हे काम भारतात नेलं आहे. उत्पानांच्या विक्रीची आवश्यक ती गरज भारतातीलच कारखान्यातून पूर्ण केली जाईल. आम्ही यापूर्वी चीनमधून आमचे फोन जगभरात वितरीत करत होतो. परंतु आता आम्ही ते भारतातून करणार आहोत,” अशी माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी दिली.

 

फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.