breadcrumb-details

बावनकुळेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

Gallery

बावनकुळेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

वेगवान न्यूज नेटवर्क
16 May 2020 04:04 PM

नागपूर :  एका नऊ वर्षीय चिमुकलीचा मुका घेऊन विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी यदुनंदन क्रिष्णराव बावनकुळे रा. खसाळा, कामठी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. तो एका भाजपनेत्याचा भाऊ आहे.

पीडित नऊ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह कुशीनगर परिसरात राहाते. तिचे वडील इलेक्ट्रिक जोडणीचे काम करतात. आरोपीही इलेक्ट्रिक जोडणीचे काम करत असून पीडितेच्या वडिलांशी ओळख होती. टाळेबंदी व संचारबंदीमुळे पीडितेची आई बाहेरगावी अडकली आहे. त्यामुळे ती एकटीच होती.

मंगळवारी आरोपी पीडितेच्या घरी आला होता. तो मद्यधुंद अवस्थेत होता. यावेळी त्याने मुलीचा लाड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानकपणे तो तिचे मुके घेऊ लागला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो ऐकायला तयार नव्हता. तो बळजबरी करीत असताना मुलीच्या वडिलाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली.