breadcrumb-details

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी मिळून तिकीट कापलं असं वाटत नाही

Gallery

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी मिळून तिकीट कापलं असं वाटत नाही

वेगवान न्यूज नेटवर्क
16 May 2020 04:12 PM

मुंबईः 

भाजपामध्ये उमेदवारीवरून पक्षनेतृत्वाच्या विरोधातील सूर ऐकू येत आहेत.विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेली निवडणूक बिनविरोध झाली असली, तरी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या चार निष्ठावंत आणि अनुभवी नेत्यांना विधानपरिषदेचं तिकीट नाकारण्यात आलं.

 

 

त्यावरून, अंतर्गत कुरबुरी, धुसफूस सुरू आहेच; पण खडसेंसह काही अन्य नेते आपला राग जाहीरपणेही व्यक्त करत आहेत.

 

 

त्यांचा रोख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं जाणवतं. मात्र, भाजपाचे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांना तसं अजिबात वाटत नाही, असे तावडे म्हणतात.