breadcrumb-details

भारताला चक्रीवादळचा धोका, 24 तासात ओदिशा किनारपट्टीवर धडकणार

Gallery

भारताला चक्रीवादळचा धोका, 24 तासात ओदिशा किनारपट्टीवर धडकणार

वेगवान न्यूज नेटवर्क
16 May 2020 04:16 PM

नवी दिल्लीः :

 

आता भारताला चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

 

पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतात ‘अम्फान’ (Amphan Cyclone) नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे.

 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या खाडीजवळ आणि अंदमान बेटाजवळील समुद्राजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अंदमान निकोबार, ओदिशा, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यात 17 ते 20 मे रोजी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Amphan Cyclone)

या चक्रीवादळादरम्यान ताशी 55 ते 65 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच हा वेग वाढत जाऊन 75 किमी इतका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ओदिशा किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी केला आहे.

 

कोणाला फटका बसणार

 

‘या’ राज्यांना चक्रीवादळाचा फटका

  • ओदिशा
  • पश्चिम बंगाल
  • त्रिपुरा
  • मिझारोम
  • मणिपूर
  • केरळ
  • अंदमान निकोबार
  • तामिळनाडू
  • कर्नाटक
  • केरळ