breadcrumb-details

नाशिकःशिक्षकाच्या पत्नीशी अनैतिक संबंधाने घेतला जीव

Gallery

नाशिकःशिक्षकाच्या पत्नीशी अनैतिक संबंधाने घेतला जीव

वेगवान न्यूज नेटवर्क
26 June 2020 11:22 AM

येवलाः 

जिल्ह्यातील येवला तालुक्यात एका शिक्षकाच्या पत्नीशी एका 28 वर्षीय तरुणाचे अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते. मात्र काल जयश्री गाडेला शिक्षक पतीने तिचा प्रियकर बाबासाहेब सुलोचन मोरे याला बोलतांना पाहिल्यानंतर पत्नी जयश्रीने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना येवला तालुक्यात घडली आहे. 

वेगवान न्यूजच्या येवला येथील स्थानिक प्रतिनिधीला पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर शिक्षकाची मयत पत्नी जयश्री गाडे हिच वय  25 वर्ष असून येवला तालुक्यातील कोळगाव येथील 28 वर्षीय तरुण बाबासाहेब सुलोचन मोरे या दोघांचे अनैतिक संबंध होते. मात्र नंतर जयश्रीने हे संबंध तोडून टाकल्यानंतरही बाबासाहेब याने जयश्री बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तू जर संबंध ठेवले नाही तर तुझ्या कुटूंबीयांना संपवुन टाकील अशी धमकी देत असे. 

23 जून रोजी बाबासाहेब हा रात्री 11-30 वेळी जयश्री च्या घराजवळ येवून दोघांचे बोलने सुरु असतांना जयश्रीचा पती अंकुश गाडे हे यांनी दोघांना बोलतांना पाहिल्यानंतर पत्नी जयश्री हिने अब्र जाईल म्हणून विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची फिर्याद येवला पोलीसांत दिली आहे. यावरुन बाबासाहेब याने तिला आत्महत्यासाठी प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर घटना अनैतिक संबंधातून झाल्याने येवल्यात तालुक्यात संशय वाढत चालला आहे. त्या रात्री नेमंक काय घडल. पती व पत्नीचे रात्री भांडण झाले का, किंवा नेमकं काय घडलं याचा तपास येवला पोलीस करत आहे. त्या रात्री घडलेली हत्या की आत्महत्या याचा शोध येवला पोलीसांना घ्यायचा आहे. गुन्हेगार कोणी असो शासन होणार यात शंकाच नाही.