breadcrumb-details

पुण्यात करोनाचे आणखी दहा बळी ! शहराचा आकडा कितीवर ?

Gallery

पुण्यात करोनाचे आणखी दहा बळी ! शहराचा आकडा कितीवर ?

वेगवान न्यूज नेटवर्क
11 July 2020 08:52 PM

वेगवान न्यूज 

पिंपरी l पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णसंख्या सात हजारजवळ पोहचली आहे. आज 427 जणांना करोनाची लागण झाली.  

त्यामध्ये शहरातील 409 रुग्णांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 6958 झाली आहे. शहरात तब्बल 2696 रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 191 रुग्णांचाही समावेश आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत शहरात दहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 8 तर शहराबाहेरील 2 जणांचा समावेश आहे.

रुग्णांच्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज सरासरी 8 ते 10 रुग्णांचा मृत्यू होत आहे. शहरातील करोनाबाधित मृतांच्या संख्येने शंभरीपार केली असून शहरातील मृतांची संख्या 102 झाली आहे. त्यामध्ये 1 जुलैपासून तब्बल 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेरील 36 जणांनाही करोनामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहे.

शहरातील मृतांची संख्या शंभऱीपार गेली असून 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेरील रुग्णांसह आजपर्यंत 138 मृत्यू झाले आहेत. आज शहरातील चिंचवड, चिखली, पिंपळे गुरव, पिंपरीगाव, पिंपरी, कासारवाडी येथील सात पुरुषांचा तर रुपीनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील देहूरोड व टिंगरे नगर पुणे येथील दोन पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, आज दिवसभरात 145 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. आजपर्यंत 3994 रुग्णांना घऱी सोडण्यात आले आहे. तर दिवसभऱात 646 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांतील 2157 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.