breadcrumb-details

बीड जिल्ह्यात आज आणखी ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Gallery

बीड जिल्ह्यात आज आणखी ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

वेगवान न्यूज / केशव मुंडे
11 July 2020 09:12 PM

बीड l जिल्ह्यात आज आणखी 9 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 212 च्या घरात गेली आहे.बीड जिल्ह्यात एकाच दिवशी वीस रुग्ण पॉझिटिव्ह वाढण्याचा कालचा पहिलाच दिवस होता. 

आज बीड जिल्ह्यातून 717 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 286 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. 

त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून 269 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड शहरातून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तसेच परळी एक गेवराई एक माजलगाव एक याप्रमाणे आजचा अहवाल प्राप्त झाला आहे.