breadcrumb-details

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन पिता पुत्र कोरोना पाॅझिटिव्ह

Gallery

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन पिता पुत्र कोरोना पाॅझिटिव्ह

वेगवान न्यूज नेटवर्क
12 July 2020 08:49 AM

मुंबईः बुलीवॅडचे बीग बी महानायक अमिताभ बच्चन  व त्यांचे पित्र अभिनेता अभिषेक बच्चन हे दोघे कोरोना पाॅझिटिव्ह आले आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे.

 

बच्चन यांनी सांगितेल. 

 

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

 सुरुवातीला बच्चन कुटुंबीयांकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली नाही. आता अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्विट करुन ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे. अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच वेळी त्यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा होती. आता ही माहिती स्वता बच्चन यांनी दिली आहे. 

 

अभिनेता अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्विट करुन अभिषेक बच्चनला करोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याचं त्यांनी स्वतः ट्विट करुन सांगितलं. त्यापाठोपाठ आता अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.