breadcrumb-details

महाराष्ट्रात करोनाचे ८ हजार १३९ नवे रुग्ण, मृत्यू संख्येने ओलांडला १० हजारांचा टप्पा

Gallery

महाराष्ट्रात करोनाचे ८ हजार १३९ नवे रुग्ण, मृत्यू संख्येने ओलांडला १० हजारांचा टप्पा

वेगवान न्यूज नेटवर्क
12 July 2020 09:00 AM

मुंबईः

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार १३९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२३ मृत्यू मागील चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार ११६ इतकी झाली आहे.

मागील २४ तासांमध्ये ४ हजार ३६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ३६ हजार ९८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ९९ हजार २०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 

सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आत्तापर्यंत १२ लाख ८५ हजार ९९१ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५५.५५ टक्के इतके झाले आहे. तर मागील २४ तासांमध्ये राज्यात २२३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण मृत्यू हे १० हजारांच्याही पुढे गेले आहेत.

प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई – २२ हजार७८२
ठाणे – ३२ हजार ५९
पुणे – २० हजार २८०
कोल्हापूर २८३
सोलापूर १३०८
औरंगाबाद – ३ हजार ९२५
नाशिक- २ हजार ८४५
नागपूर – ५७०

आज राज्यात ८ हजार १३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या आता २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाली आहे.