breadcrumb-details

नाशिक - गैरहजर आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा !

Gallery

नाशिक - गैरहजर आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा !

वेगवान न्यूज नेटवर्क
12 July 2020 09:47 AM

नाशिक l महापालिकेने मोठी कारवाई केली आहे.साथरोग कायद्यान्वये महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई म्हणावी लागेल..नाशिक शहरातील झाकीर हुसेन रुग्णालयातील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांविरुद्ध कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेचे झाकीर हुसेन रुग्णालय सध्या कोविड सेंटर असून, येथे तीन महिन्यांपासून संशयित व बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेथील लॅब तंत्रज्ञ व कोविड कक्षात नेमणूक केलेला कर्मचारी असे दोघे जण गेल्या महिनाभरापासून कामावर येत नव्हते. रुग्णालय प्रशासनातर्फे कामावर हजर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

महापालिकेच्या आरोग्य पथकाने शुक्रवारी संध्याकाळी रुग्णालयाला भेट दिली असता ते दोघे गैरहजर असल्याचे समोर आले. त्यामुळे पथकातील सुनील दत्तात्रय गाडे यांनी शुक्रवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित दोघांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित दोघेही कंत्राटी कामगार असून, कोरोनाच्या भीतीपोटी कामावर येत सल्याची माहिती समोर आली आहे.