breadcrumb-details

मोदीजी दुस-या देशाची सेकेंड (हातमिळवणी) करुन प्रश्न सुटत नाही-शरद पवार

Gallery

मोदीजी दुस-या देशाची सेकेंड (हातमिळवणी) करुन प्रश्न सुटत नाही-शरद पवार

वेगवान न्यूज नेटवर्क
12 July 2020 10:23 AM


मुंबई: 'नव्वदच्या दशकात देशावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यातून देशाला बाहेर काढण्याचं काम तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी केलं. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या पाठिंब्यानं त्यांनी नेहमीची चौकट सोडून निर्णय घेतले आणि अर्थव्यवस्था सावरली. आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे,' असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम, केंद्र सरकारच्या कारभाराची पद्धत आणि भारत-चीनच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी चीन मध्ये जाऊन त्यांच्या हातामध्ये हात मिळविले म्हणून सर्व प्रश्न सुटत नसल्याचे शरद पवार यांनी बोलतांना सांगितले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही सरक्षण खात्याच्या बाबत काही वेगळ निर्णय घेतल्याचे दिसत नाही. चीन-भारत संघर्षामध्ये चीनची मोठी चूक आहे. चीन व आपल्यात संघर्ष नको, आमच्या काळात जो करार झाला होता. त्यात बंदूक वापरायची नाही असा करार होता. आपण तो पळाला आणि चीन नेही तो पाळला होता.