breadcrumb-details

अमेरिकेकडून भारताला चीनविरोधात मदत मिळेल याची ठोस खात्री नाही

Gallery

अमेरिकेकडून भारताला चीनविरोधात मदत मिळेल याची ठोस खात्री नाही

वेगवान न्यूज नेटवर्क
12 July 2020 10:57 AM

वॉशिंग्टन:

अमेरिकेकडून भारताला मदत मिळेल याची काहीही ठोस खात्री देता येणार नसल्याचे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले.  भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढत असताना अमेरिकेकडून भारताला मदत देण्याचे आश्वासन राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी दिले आहे. मात्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन वक्तव्यामुळे या विधानावरुन पुन्हा चर्चा ला उधान आले आहे. 

 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ट्रम्प हे नोव्हेंबरमधील निवडणुकीनंतर काय करतील, हे सांगता येणार नाही. चीन आपल्या सीमेलगत असलेल्या देशांसोबत सीमा प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आहे. चीनचे भारत, जपान आणि अन्य देशांसोबत त्यांचे संबंध खराब झाले असल्याचे निश्चित आहे. ट्रम्प हे चीनसोबतच्या संबंधांना व्यापार संबंधाच्यादृष्टीने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

पुढे त्यांनी म्हटले की, आगामी चार महिने ट्रम्प यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोणतीही अडचण होईल, असा निर्णय ट्रम्प घेणार नाहीत.

करोनामुळे आधीच ट्रम्प यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भारत-चीन सीमेवर सध्या तरी शांतता असावी अशी त्यांची इच्छा असणार, असा अंदाज बोल्ट यांनी व्यक्त केला. ट्रम्प प्रशासनात एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यानच्या काळात बोल्टन अमेरिकेचे मुख्य सुरक्षा सल्लागार होते.

ट्रम्प यांची माध्यम सचिव कायली मॅकनेनी यांनी सांगितले की, चीनवर होणाऱ्या कारवाईबाबत आम्ही इतक्याच काही सांगणार नाही. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याबाबत लवकर घोषणा करतील असे त्यांनी सांगितले. मागील १५ दिवसांत अमेरिकेने चीनला दणका देणारे ९ निर्णय घेतले आहेत.