breadcrumb-details

रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या !

Gallery

रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या !

वेगवान न्यूज / राजू शेख
28 July 2020 07:25 AM

रायगड l रायगड मध्ये एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याची क्रूरुर धक्कादायक प्रकार रोहा तालुक्यात घडली दिनांक 26 रोजी रात्री ही घटना उघडकीस आली
सविस्तर माहिती अशी की रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका 15 वर्षीय मुलगी आपल्या आजोबांना आनण्याकरिता शेतावर दुचाकी घेऊन गेली असता होती, मात्र रात्र होऊन सुद्धा ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियानी तिचा शोध घेण्यास सुरू केली,अंधार कारणास्तव तिचा शोध घेणे शक्य नाही होत नसल्याने गावकऱ्यांच्या मदतीने शोध कार्य केले,

रात्री उशिरा नऊ सव्वा नऊ च्या सुमारास ताम्हणेशेत गावाच्या हद्दीत  एका दगडावर ती मृत्य अवस्थेत आढळून आली,त्या अवस्थेत आपल्या मुलीला पाहून तुच्या आई वडील सर्व कुटुंबाची पायाखालील जमिनच सरखली,ही घटना तालुक्यात 27 तारखेला वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली व नागरिकांन मध्ये एकच संतापाची लाट उसळली,या घटनेनंतर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अनिल पारसकर,अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, तसेच रोह्या तालुक्याचे डीवायएसपी सूर्यवंशी तसेच रोहा तालुक्याचे पोलीस निरीक्षक  बंडगर,तपासाचे चक्र फिरविले,

 पोलीस अधीक्षक यांनी आठ पथके तयार केली व सर्च ऑपरेशन सुरू केले अश्या नराधमाला पकडने गरजेचं होतं ज्याने अशे कृत्य केले होते,आणि अवघ्या 12 तासाच्या आत त्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलीसा ना यश आले,त्याने केलेल्या या कृत्याची त्यानें कबुली दिली असून अजून कोण कोण गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत,