breadcrumb-details

अमरावती - बापाने आपल्याच सहा वर्षीय मुलाला पाण्यात बुडवून मारले !

Gallery

अमरावती - बापाने आपल्याच सहा वर्षीय मुलाला पाण्यात बुडवून मारले !

वेगवान न्यूज नेटवर्क
28 July 2020 08:12 AM

अमरावती l चिखलदरा येथे एका बापाने आपल्याच सहा वर्षीय मुलाचा अतिशय निर्दयतेने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.काल घडलेल्या घटनेने परीसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्या क्रूर बापाने गुन्ह्याची कबुली दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी बापाला अटक केले असून सदर खून प्रकरण तपासात घेतले आहे. आरोपी रामदास हिरालाल सेलुकर वय 35, रा. तलहटी, मोझरी, ता. चिखलदरा असे खुन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने आपलाच 6 वर्षीय मुलगा धर्मा रामदास सेलुकर याची हत्या केली. 26 जुलै रोजी रामदास याने त्याच्या शेतात धर्माला नेले व नाल्यामध्ये बुडवून त्याची हत्या केली. यानंतर रामदासने मुलाचा मृतदेह एक खड्डा खणून त्यात पुरून टाकला. घरातल्या व्यक्तींनी धर्माची रात्री उशिरापर्यंत वाट पाहिली, आसपासच्या भागात त्याच्यासाठी शोधाशोधही करण्यात आली, मात्र तो सापडला नाही. यावेळी घाबरलेल्या रामदासने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.