breadcrumb-details

देवळा तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण ; आज आढळले २२ रुग्ण पॉझिटिव्ह

Gallery

देवळा तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण ; आज आढळले २२ रुग्ण पॉझिटिव्ह

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
28 July 2020 06:06 PM

दहिवड l देवळा तालुक्यात आज एकूण २२ कोरोनाबाधीत रुग्णांची विक्रमी वाढ झाल्याने देवळा तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण झाले असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


तालुका प्रशासनाला आज २८ जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजता ९२ अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये एकूण २२ अहवाल पॉझिटिव्ह तर ७० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून त्यात
उमराणा-१ (८७ वर्षीय महिला)
सावकी-१ (३७ वर्षे महिला)
मेशी -१ (३८ वर्षे पुरुष)
विठेवाडी -२(४५ व १७ वर्षाच्या महिला)
खुंटेवाडी-१ (२३ वर्षे पुरुष)
वाखारी -१ (३२ वर्षे महिला)
लोहोणेर-२ (४१ वर्षे पुरुष, ४६ वर्षे महिला)
नाशिक -२ (४२ वर्षे महिला,२८ वर्षे पुरुष)
वाजगाव--२ (३९ वर्षे महिला,५७ वर्षे पुरुष)
देवळा- ६
३७, १३, ३७, २८, १३ वर्षाच्या सर्व महिला,
६२ वर्षीय पुरुष
कापशी--३
४८ व २९ वर्षे पुरुष
४४वर्षे महिला
असे २२ रुग्ण असल्याची माहिती देवळा तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी दिली आहे. त्यात ९१ स्वॅब देवळा येथून घेण्यात आले होते, तर १ अवहाल हा खाजगी लॅब मधून पॉझिटिव्ह आला आहे.

देवळा तालुक्यातील कोरोनामुक्त असलेल्या अनेक गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रार्दुभाव सातत्याने वाढू लागला आहे तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
देवळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता शतक पूर्ण केले असून १०० वर जाऊन पोहचली आहे यामध्ये २७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दुर्दैवाने तिघा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत ७० रुग्ण उपचार घेत असून काही रुग्ण देवळा येथील कोविड केअर सेंटरला तर काही रुग्ण चांदवड येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला आणि एक रुग्ण नाशिक येथील मविप्रच्या रुग्णालयात उपचार घेत असून एका रुग्णाला होम आयोसोलेशन करण्यात आले आहे.