breadcrumb-details

मका खरेदीची अधिक क्षमता वाढविण्यासाठी खा.डॉ.भारती पवार यांची केंद्रीय राज्य मंत्र्यांशी चर्चा

Gallery

मका खरेदीची अधिक क्षमता वाढविण्यासाठी खा.डॉ.भारती पवार यांची केंद्रीय राज्य मंत्र्यांशी चर्चा

वेगवान न्यूज / समीर पठाण
31 July 2020 06:57 PM

लासलगाव l केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दुर्ष्टीने वारंवार मका खरेदी क्षमता वाढवून देण्यात आली.परंतु अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीची मका शिल्लक आहे. परंतु ज्यावेळेला ऑनलाईन मका खरेदी पोर्टल बंद पडले त्यावेळी मोठ्या संख्येने नावे नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी खा.डॉ.भारती पवार यांच्याकडे मका खरेदी सुरू करण्यासाठी धाव घेतली. त्यानुसार खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेशी भ्रमणध्वनीहुन तत्काळ संपर्क करून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचेसमोर मांडल्या प्रसंगी मंत्री महोदयांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सरकारने मका खरेदीसाठी वाढीव प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा जेणेकरून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक असेल असे खा.डॉ.भारती पवार यांना सांगितले. 

त्याचबरोबर आजपावेतो ज्या ज्यावेळी केंद्राकडून खरेदी क्षमता वाढवून देण्यात आलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलास मिळाला आहे त्याबद्दल केंद्रीय मंत्री महोदयांचे खा.डॉ.भारती पवार यांनी आभार व्यक्त केले. त्याप्रमाणे नव्याने केंद्रीय मंत्री महोदयांना मका खरेदी क्षमता वाढवून मिळण्याकरिता पत्र तथा मेल देखील केला असून तरी देखील महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्राकडे तत्काळ प्रस्ताव पाठवा अशी मी मागणी करते जेणेकरून मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे आवाहन खा.डॉ.भारती पवार यांनी केले आहे.