breadcrumb-details

नाशिक - कोरोनायोद्धा डॉ.अजिंक्य वैद्य यांचे निधन

Gallery

नाशिक - कोरोनायोद्धा डॉ.अजिंक्य वैद्य यांचे निधन

वेगवान न्यूज / गणेश ओझा
31 July 2020 07:56 PM

वावी-येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजिंक्य बाळासाहेब वैद्य (३२) यांचे  हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुदैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सकाळी ८ वाजेच्या दरम्यान छातीत दुखू लागल्याने नाशिक येथे हलविण्यात आले होते त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्र व वावी परिसरात शोककळा पसरली आहे. कोरोनाच्या वारेगाव ते वावी या काळात चांगली कामगिरी केल्याने परिसरात चांगला कोरोनायोद्धा आपल्यातून गेल्याची भावना सर्वसामान्य जनतेची होती.त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.