breadcrumb-details

देवळा - भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर कोरोना पॉझिटिव्ह

Gallery

देवळा - भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर कोरोना पॉझिटिव्ह

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
31 July 2020 09:35 PM

दहिवड l जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना कोरोनाची लागण झाली असून चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या पाठोपाठ केदानानांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

   जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या,सामान्य जनतेच्या समस्या तसेच कोरोनाचा वाढता आलेख विविध भागातील विकास कामे यासंदर्भात बैठका घेत होते या कालावधीत त्यांना त्रास जाणवू लागल्याने आणि कोरोनाची लक्षणे वाटल्याने त्यांनी काल दि.३० जुलै गुरुवारी घशाचे स्त्राव तपासणी साठी पाठवले होते त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती स्वतः केदा आहेर यांनी दिली आहे.

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह मिळताच त्यांनी देवळा येथील कार्यक्षेत्रात दौरा करताना आपल्या संपर्कात आलेल्या पदाधिकारी , कार्यकर्ते, देवळा बाजार  समिती मधील व्यापारी, शेतकरी कर्मचारी व तालुक्यातील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी  तसेच कुणाला काही त्रास जाणवत असल्यास तात्काळ आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी,तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केदा आहेर यांनी केले आहे .
जनतेच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन जनसेवेसाठी तत्पर राहील , ' असा विश्वास केदा आहेर यांनी  बोलताना व्यक्त केला आहे.