breadcrumb-details

नाशिक - साडे तेरा लाखांचा अपहार करणाऱ्या आरोपीच्या सिन्नर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Gallery

नाशिक - साडे तेरा लाखांचा अपहार करणाऱ्या आरोपीच्या सिन्नर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वेगवान न्यूज / शरद शेळके
31 July 2020 10:09 PM

नाशिक, सिन्नर l दि.१७/०७/२०२० रोजी श्री भरत हरचंद मराठे वय ५९ वर्ष, नोकरी, रा. चवन वैभव कॉलनी, वडाळा पाथर्डी रोड, गजानन महाराज मंदीरीचे बाजुला, इंदिरानगर नाशिक (ओ.के. लॉजिर्टीक प्रा.लि.प्लॉट नंबर २७ / २८ सातपुर लिंकरोड चिंचोळे फाटा अंबड नाशिक या टान्सपोर्ट कंपनी मॅनेजर ) यांनी दिलेल्या फियार्दी प्रमाणे ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करीत असलेला चालक नामे संदीप दगडुबा मुंढे, रा वागदरवाडी ता.आंबेजोगाई जि बिड यास दि.०४/०७/२०२० रोजी चेन्नई वडदरम येथुन अपोलो टायर कंपनीतुन ७४९ टायरांनी भरलेला टाटा कंपनीचा कंन्टेनर क. NL-01-AB-5940 हे वाहन चालक या नात्याने दींडोरी, नाशिक येथे पोहचविण्याची जबाबदारी सोपविलेली असतांना,आरोपी कंन्टेनर ट्रक चालकाने दि. ०८/०७/२०२० रोजी कंन्टेनर क्र. NL - 01-AB-5940 याचे जीपीएस बंद केले.

त्यानंतर ट्रान्सपोर्ट मालकाने सदर ट्रकचा चालक संदीप दगडुबा मुंढे यास वारंवार संपर्क करून देखील त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याच्याबाबत व टायरांनी भरलेल्या ट्क कंटेनरबाबत कसलाही पत्ता लागत नव्हता. दि.१२/०७/२०२० रोजी सदरचा कंटेनर हा सिन्नर पोलिस ठाणेच्या हृददीत साईनाथ ढाबा येथे बेवारस स्थितीत पार्क करून मिळुण आला.

तसेच कंटेनरच्या मागील दरवाजास लावलेले सील तुटलेले असल्याचे दिसुन आल्याने त्यातील टायरची तपासणी केली असता, एकुन १३,४६, २६२/ - रू किंमतीचे अपोलो कंपनिचे १४९ लहान मोठे टायर चोरीस गेलेले आढळुन आले. प्राथमिक चौकशीअंती ट्रक चालक संदीप दगडुबा मुंढे रा वागदरवाडी ता.आंबेजोगाई,जि बिड, याचेविरूध्द टायरांबाबत केलेल्या अपहारासंदर्भात दि.१७/०७/२०२० रोजी सिन्नर पोलीस ठाणेत भादवि ४०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयात चालकाचा व त्याने अपहार केलेल्या टायरांचा शोध घेवुन तपासकरणेकामी पो.अधीक्षक नाशिक ग्रामिण, श्रीमती. आरती सिंग, अप्पर. पो. अधी.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड विभाग, श्री. माधव रेडडी यांनी दिलेल्या सुचनां व मार्गदर्शनाप्रमाणे सिन्नर पोलीस स्टेशनवचे पोलीस निरीक्षक श्री . साहेबराव पाटील यांनी नमुद गुन्हयाचा तपास करणेकामी तपासी अधिकारी सपोनि/विजय माळी, पोना/१८३७ भगवान शिंदे, पोशि/ २६८५ विनोद टिळे,पोशि/१८१५ समाधान बोराडे असे पथक बिड जिल्हयात रवाना केले. सपोनि/विजय माळी, पोना/१८३७ भगवान शिंदे,पोशि/२६८५ विनोद टिळे,पोशि /१८१५ समाधान बोराडे यांनी गुन्हातील ट्रकचालक आरोपी नामे संदीप दगडुगबा मुंढे रा.वागदरवाडी ता. अंबेजोगाई जि बिड याचे राहते गावी जावुन शोध घेतला. परंतु तो गावात व परीसरात मिळुन आला नाही.आरोपी सदयस्थितीत राहत असलेल्या पत्त्याबाबत गोपनियरित्या तपासकरून सदर टूक चालक हा जनतानगर झोपडपटटी, काशिमिरा,जि. ठाणे येथे राहत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने. सपोनि माळी व पथक ठाणे येथे जावुन आरोपीतावा शोध घेवुन त्यास जनतानगर झोपडपटटी, काशिमिरा, ठाणे येथुन शिताफिने ताब्यात घेतले.

अटक आरोनी अपहार केलेले टायर हे अपोलो कंपनीचे गोडावुनमधुन डीस्कांउटमध्ये कमी किंमतीत विकण्यासाठी आनलेले असल्याचे पटवुन देवुन व दिशाभुल करून त्याचे ओळखीचे लोकांना लातुर,बिड,सोलापुर,अहमदनगर अशा वेगेवेळया जिल्हयात विकलेले असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने अटक आरोपीसह लातुर, बिड,सोलापुर, अहमदनगर येथे जावुन टायर विकत घेणारे लोकांचा शोध घेवुन१३,४६,२६२ रू किं चे अपहार झालेल्या १४९ अपोलो कंपनीच्या टायरापैकी १४१ अपोलो कंपनीचे टायर हस्तगत केलेले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / विजय माळी हे करीत आहे.