breadcrumb-details

कर्ज काढून घर बांधले ! पालकमंत्री समोर घरकुल लाभार्थ्याने मांडली व्यथा

Gallery

कर्ज काढून घर बांधले ! पालकमंत्री समोर घरकुल लाभार्थ्याने मांडली व्यथा

वेगवान न्यूज / अमोल झाडे
31 July 2020 10:23 PM

वर्धा l नगर पंचायतीने  पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकूला मंजुरी दिली. लाभार्थानी उसनवारी आणि कर्ज काढून घरकूलाची निर्मिती केली मात्र अद्याप घरकुलाचा निधी मिळाला नसल्याने लाभार्त्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे.प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे  पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 

                समुद्रपुर येथे घरकुल लाभार्थाना नगर पंचायतींने आज पर्यत घरकूल पूर्ण होऊन सुद्धा अद्याप पावेतो १ लाख तर काहींना १ लाख ६० हजार रुपये दिलेले आहे. मात्र उर्वरीत रक्कम ९० हजार रुपये .६ महिण्यापासुन लाभार्थाना दिलेले नाही. आम्ही घरकूल लाभार्थी नगरपंचायत मध्ये जाऊन वारंवार विचारणा केली मात्र  लाभार्थाना समाधान कारक उत्तर मिळत  नाही.असे निवेदनातून म्हटले आहे  उदारीत घेतलेल्या घराच्या साहित्याचे दुकानदारांना पैसे देणे बाकी असल्याने व्यापारी पैसा साठी आम्हा कडे तगादा लावित आहे. आम्हा घरकुल लाभार्थ्याना बऱ्याच दुकानदारांचे पैसे दयायचे आहे. त्यामुळे आम्ही घरकूल लाभार्थी त्रस्त  आहे. असे निववेदनातून लाभार्थ्यांचे गऱ्हाणे मांडलेले आहे.

             निवेदन देते वेळी नगरसेवक मधूकर कामडी, आशिष अंड्रस्कर , प्रदिप डगवार, सागर कापकर, संजय कांबळे, नंदु घरडे, इरफान कुरेशी, माया, मुरस्कर, संजय वेले, संजय गुंडेवार, घनश्याम मेंढे,यांच्यासह  घरकुल लाभार्थी उपस्थित होते.