breadcrumb-details

हवामान अलर्ट : महाराष्ट्रात पुढील २४ तासात होणार अतिमुसळधार पाऊस !

Gallery

हवामान अलर्ट : महाराष्ट्रात पुढील २४ तासात होणार अतिमुसळधार पाऊस !

वेगवान न्यूज नेटवर्क
02 August 2020 12:01 PM

मुंबई l मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्याच बरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडले असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद इथं 2 ऑगस्ट म्हणजेच आज तुरळक पाऊस पडेल. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.हवामानाच्या या बदलांमुळे सुमुद्र किनारा असलेल्या भागांमध्ये मोठा प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

वाऱ्याचा वेगही मोठा प्रमाणात असेल. यादरम्यान, समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात उतरू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा कमबॅक होणार आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी आता पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे. पण पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.हवामान खात्याने (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने सादर केलेल्या बुलेटिनमध्ये आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.