breadcrumb-details

रासाका चालू होण्यासाठी सचिन होळकर यांनी घेतली कृषिमंत्री भूसे यांची भेट

Gallery

रासाका चालू होण्यासाठी सचिन होळकर यांनी घेतली कृषिमंत्री भूसे यांची भेट

वेगवान न्यूज / समीर पठाण
02 August 2020 01:13 PM

लासलगाव l

गेल्या अनेक दिवसांपासून रानवड सहकारी साखर कारखाना सुरू होणे बाबत काम चालू आहे मात्र अद्याप त्यादृष्टीने गती आली नाही.रानवड साखर कारखाना सुरू होणे ही शेतकऱ्यांसाठी तसेच ऊस उत्पादकांसाठी अत्यंत आवश्यक आहे.कारखाना लवकर सुरू व्हावा यासाठी कृषीतज्ञ तसेच नासिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन यासंदर्भात चर्चा केली.

निवेदनानुसार गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात आणि परिसरात चांगला पाऊस पडत आहे.त्यामुळे जमिनीतील पाण्याची उपलब्धता वाढली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड केली आहे मात्र जिल्ह्यातील एकच साखर कारखाना सुरु असल्याने ऊस विक्री साठी अनेक अडचणी येत आहे.गेल्या वर्षीच्या ऊस उत्पादकांचा ऊस पंधरा महिन्यांचा होऊन देखील तुटला नाही त्यात नव्याने ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे मजुरांचा अभाव आणी इतर पिकांच्या उत्पादनाची शाश्‍वती नसल्याने अनेक शेतकरी ऊस पिकाकडे शाश्वत उत्पन्नाचा आधार म्हणून बघत आहेत.भविष्यात कारखाना सुरू झाला नाही तर उसाची अवस्था कांदा टोमॅटो तुर इत्यादी पिकासारखी होईल आणि त्यांची विक्री करणे अवघड होऊन बसेल निफाड साखर कारखाना आणि त्याची अवस्था पाहता कारखाना सुरू होण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो.

या सर्व बाबींचा विचार करता रानवड सहकारी साखर कारखाना अत्यंत लवकर सुरू होणे गरजेचे आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी कारखाना लवकर सुरू करण्याचं आश्वासन दिले तसेच त्यासंदर्भात कामाची गती वाढवण्याकडे कल असल्याचा सांगितलं अशी माहिती सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.याप्रसंगी किसान काँग्रेस चे स का पाटील, शिवसेनेनेचे जेष्ठ नेते सुरेश डोखळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, पंडित महाराज कोल्हे आदि उपस्थित होते.